कालिका यात्रोत्सवास प्रारंभ | पहिल्याच माळेला हजारो भाविक देवीच्या चरणी लीन

Kalika Mata Yatra Nashik | 'कालिका माता की जय'च्या घोषाने मंदिर परिसर दुमदुमला
Kalika Mata Yatra Nashik
ग्रामदैवत श्री कालिका मातेच्या मुर्तीला करण्यात आलेला साजश्रृंगार. दुसऱ्या छायाचित्रात दर्शनासाठी महिला भाविकांची झालेली गर्दी. छायाचित्र- हेमंत घोरपडे
Published on
Updated on

नाशिक : नाशिकची ग्रामदैवता श्री कालिका मातेच्या नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. मंदिरात गुरुवारी (दि. ३) पहाटे पाच वाजता विश्वस्तांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच माळेला हजारो भाविक देवीच्या चरणी लीन झाले. 'कालिका माता की जय'च्या घोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता.

श्री कालिका मंदिरात पहाटे साडेतीन वाजता महाआरती करण्यात आली. पहाटे पाच वाजता विश्वस्तांच्या हस्ते कलश पूजन व ध्वजारोहण होऊ घटस्थापन झाली. सकाळी ८ वाजता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते श्री कालिका मातेचे महापूजन व महाआरती झाली. दुपारी १२ वाजता देवीला महानैवेद्य अर्पण करण्यात आला.

श्री कालिका देवी मंदिर समितीकडून नवरात्रीनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी महिला मंडळाने सप्तशती पाठ पठण केले. सायंकाळी मंगलवाद्याचा गजर करण्यात आला. पुढील नऊ दिवस हा सोहळा सुरू राहणार आहे. दररोज रात्री देवीचा शृंगार आणि वस्त्रालंकार सोहळा पार पडणार आहे. नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य कार्यरत आहेत.

परिसराला जत्रेचे स्वरूप

श्री कालिका देवी नवरात्राेत्सवानिमित्ताने परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मंदिर परिसरात पेढे व प्रसाद विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहे. तसेच गडकरी सिग्नल ते मुंबई नाका या भागात रस्त्याच्या दुतर्फा छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी फुले व प्रसाद विक्री, खेळणी, घरगुती साहित्य व खाद्य पदार्थांचे स्टॉल लागले आहेत. रहाट पाळणे व अन्य खेळणीही येथे उपलब्ध आहे. पहिल्या दिवशी भाविकांनी जत्रेचा आनंद लुटला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news